इशान किशन ऑन फायर! नामिबिया विरूद्धच्या सामन्यात 250च्या स्ट्राईकने ठोकलं अर्धशतक
T20 World Cup 2026, Ishan Kishan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 18व्या सामन्यात भारत आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या अर्धशतकी खेळीने सामन्याचं चित्र बदललं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना नामिबियाशी होत आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा तब्येत असल्याने खेळला नाही. पण त्याची उणीव इशान किशनने जाणवून दिली नाही. त्याने आक्रमक खेळी करत नामिबियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने 20 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत 50 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 250 चा होता. त्यामुळे त्याचा फॉर्म काय आहे हे अंदाज येऊन जातो. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये 1 गडी गमवून 86 धावा केल्या. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने या सामन्यात 24 चेंडूंचा सामना केला आणि 61 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 254.17 चा आहे. त्याच्या आक्रमक खेळीने टीम इंडियाचे चाहते चांगलेच खूश झाले. (Photo- BCCI Twitter

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून पाचवं जलद अर्धशतक आहे. यापूर्वी 2007 मध्ये युवराज सिंगने 12 चेंडूत, केएल राहुलने 2021 मध्ये 18 चेंडूत, रोहित शर्माने 2024 मध्ये 19 चेंडूत, युवराज सिंगने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत आणि आता इशान किशनने 20 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने दुसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मासोबत 79 धावांची भागीदारी केली. यात इशान किशनच्या एकट्याच्या 59 धावा आहेत. यावरून त्याने किती आक्रमक फलंदाजी केली हे दिसून येते. (Photo- BCCI Twitter)