
T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत व्हिक्ट्री परेड निघणार आहे.

मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज आहे. या बसचे फोटो समोर आले आहेत.

मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा मार्ग आहे. संध्याकाळी 5.00 वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलं आहे.

जवळपास दोन तास ही व्हिक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही व्हिक्ट्री परेड निघणार आहे. यावेळी 2007 च्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी ताज्या होतील.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी या क्रीडा वाहिन्यांवर सकाळी 9 वाजल्यापासून व्हिक्ट्री परेडपर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्व घडामोडी पाहता येतील.