
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे एकाच ए ग्रुपमध्ये आहेत.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. उभयसंघातील महामुकाबला हा 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यालाा स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरु होईल.

rohit sharma and hardik pandya team india

तसेच पाकिस्तानने सर्वात शेवटी वर्ल्ड कप संघ जाहीर केला. बाबर आझम पाकिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 7 सामने झाले आहेत. टीम इंडियाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला 1 सामना जिंकण्यात यश आलंय. तर एक सामना टाय झालाय.

टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी करणार आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना हा आयर्लंड विरुद्ध असणार आहे.