Retirement: 3 महिन्यात टीम इंडियाच्या 5 खेळाडूंची निवृत्ती, दोघांचा कायमचा अलविदा
Team India Cricket Retirement: टीम इंडियाच्या 5 पैकी 2 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा अलविदा केला. तर तिघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवन याने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. शिखर धवन यासह गेल्या 3 महिन्यात क्रिकेटला अलविदा करणारा टीम इंडियाचा एकूण पाचवा फलंदाज ठरला. धवनआधी निवृत्ती जाहीर करणाऱ्या उर्वरित टीम इंडियाच्या 4 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. (pc- Bcci)

टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी इतिहास रचला. रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत 17 वर्षांनंतर टी 20i वर्ल्ड कप जिंकला.त्यानंतर टीम इंडियाच्या तिघांनी झटपट टी 20i क्रिकेटला रामराम ठोकला. (pc- Bcci)

रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर आपण या सर्वात लहान प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहित शर्माने टीम इंडियासाठी 2 टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा पहिला खेळाडू हा बहुमान मिळवला. रोहितने त्याच्या टी 20i कारकीर्दीत 5 शतकं आणि 32 अर्धशतकांसह 159 सामन्यांमध्ये 3 हजार 3 धावा केल्या. (pc- Bcci)

रोहितसह विराट कोहली यानेही टी 20i क्रिकेटला अलविदा करत असल्याचं जाहीर केलं. विराटने भारतासाठी टी20i क्रिकेटमध्ये 125 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांसह 4 हजार 188 धावा केल्या. (pc- Bcci)

रोहित-विराटनंतर ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही काही दिवसांनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. जडेजाने 74 सामन्यांमध्ये 515 धावांसह 54 विकेट्सही घेतल्या. (pc- Ravindra Jadeja)

तर त्याआधी अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची 1 जून 2024 रोजी घोषणा केली. कार्तिकने 26 कसोटीत 1025, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 आणि 60 टी20iमध्ये 686 अशा धावा केल्या. (pc- Bcci)