Shubman Gill : शुबमन गिलसाठी 2025 वर्ष व्हेरी व्हेरी स्पेशल, 6 महिन्यात काय झालं?

Shubman Gill Records : शुबमन गिल याच्यासाठी 2025 या वर्षातील 6 महिने हे ऐतिहासिक आणि अविस्मरणीय राहिले. शुबमनने या 6 महिन्यात क्रिकेटर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. जाणून घ्या शुबमनसोबत 6 महिन्यात काय काय झालं?

| Updated on: Jul 04, 2025 | 4:41 PM
1 / 7
टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन शुबमन गिल याच्यासाठी 2025 हे वर्ष आतापर्यंत खास ठरलं आहे. शुबमनला गेल्या काही वर्षांत टीकेचा सामना करावा लागला. मात्र शुबमननसाठी गेली 6 महिने विशेष राहिली. शुबमनसाठी हे 6 महिने क्रिकेटर आणि वैयक्तिक आयुष्यात अविस्मरणीय राहिले. (Photo: PTI)

2 / 7
शुबमन आणि त्याचं कुटुंब या वर्षी नव्या घरात शिफ्ट झाले. शुबमनचं नवं घर हे पंजाबमधील फिरोजपूरमध्ये आहेत.  शुबमनने जानेवारीमध्ये लोहरी सण साजरा करताना नव्या घराची झलक दाखवली होती. (Photo: Instagram/Shubman Gill)

3 / 7
शुबमनने फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शतक ठोकलं. शुबमनने बांगलादेश विरुद्ध शतक करत भारताला विजय मिळवून देणयात प्रमुख भूमिका बजावली होती. (Photo: PTI)

4 / 7
त्यानंतर एमआरएफ या लोकप्रिय टायर कंपनीने मार्च महिन्यात शुबमनसह करार केला. शुबमन यासह दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर एमआरएफकडून करार मिळवणयात यशस्वी ठरला. शुबमनला या करारानुसार वार्षिक 12 कोटी रुपये मिळणार आहेत.

5 / 7
शुबमनची 24 मे रोजी भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमनला त्या जागी नियुक्त करण्यात आलं. (Photo: PTI)

6 / 7
शुबमनने कर्णधार होताच पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध चौथ्या स्थानी बॅटिंगला येत शतक केलं. शुबमनने लीड्सध्ये शतक केलं. शुबमनने यासह कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शतक करणाऱ्यांच्या यादीत धडक दिली.  (Photo: PTI)

7 / 7
त्यानंतर शुबमनने जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला. शुबमनने इंग्लंड विरुद्ध 269 धावांची ऐतिहासिक खेळी केली. शुबमन इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक करणारा पहिला भारतीय ठरला.  (Photo: PTI)