
रोहित शर्मा याने 2014 साली श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यात अशी खेळी केली होती, ज्याचा कुणीच विचार केला नव्हता. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. रोहितचा हा वर्ल्ड रेकॉर्ड 10 वर्षांनंतरही कायम आहे.

रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये एकसेएक असे विक्रम केले आहेत, जे इतरांना करताना घाम फुटला आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 वेळा द्विशतकी खेळी केली आहे. रोहितने 208, 209 आणि 264 अशा धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम आहे. रोहितने कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही प्रकारात एकूण 620 सिक्स लगावले आहेत.

रोहितने एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा महारेकॉर्ड केला आहे. रोहितने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं लगावली होती. रोहितच्या या विक्रमाच्या आसपासही कुणी नाही.

रोहितच्या नावावर टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. रोहितने त्याच्या टी 20i कारकीर्दीत एकूण 205 सिक्स लगावले आहेत. (सर्व फोटो : Icc)