
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीच्या चाचणी परीक्षेत टीम इंडिया पास झाली आहे. टी20 मालिकेत न्यूझीलंडला 4-1 ने पराभवाची धूळ चारली. पाचव्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडचा संघ 225 धावा करू शकला. (Photo- BCCI Twitter)

भारताने पाचव्या टी20 सामन्यात एकूण 23 षटकार मारले. यात इशान किशनने 10, सूर्यकुमार यादवने 6, हार्दिक पांड्याने 4, अभिषेक शर्माने 2 आणि शिवम दुबेने एक षटकार मारला. यासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला. (Photo- BCCI Twitter)

ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजविरूद्ध 2025 मध्ये 64 षटकार मारले होते. या आधी इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये 64 षटकार मारले होते. आता भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 69 षटकार मारले आहे. भारताने पाच षटकार अधिक मारत विक्रम मोडला. (Photo- BCCI Twitter)

भारताने पाचव्या टी20 सामन्यात 23 षटकार मारत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. भारताने यापूर्वी 2024 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये 23 षटकार मारले होते. यासह या यादीत आपल्या रेकॉर्डसह पहिल्या स्थानावर कायम आहे. (Photo- BCCI Twitter)

भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या टी20 सामन्यात दोन्ही देशांचे मिळून एकूण 36 षटकार पडले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वाधिक षटकार आहे. बल्गेरिया विरुद्ध जिब्राल्टर सोफिया या देशात झालेल्या सामन्यात 41 षटकार मारले गेले आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका सामन्यातील 35 षटकारांचा विक्रम मोडला. (Photo- BCCI Twitter)