
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियातून दूर असलेल्या या वेगवान गोलंदाजाने त्याच्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावली. (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या इंस्टाग्रामवरुन मित्राच्या लग्नाची माहिती दिली. सिराजने त्याच्या मित्रासोबतचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असूनही कोणताही बडेजावपणा केला नाही. सिराजने त्याच्या या साध्या स्वभावाने उपस्थितांची मनं जिंकली. (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात शेरवानी घातली होती. सिराजने नवरदेवासह फोटो काढले. सिराजने मित्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. (Photo Credit : Instagram)

लग्नात सिराज व्यतिरिक्त अनेक मित्रांनी उपस्थिती लावली. या सर्व मित्रांनी नवरदेवासह फोटो काढले. सिराजने नवरदेव आणि सर्व मित्रांसोबतचे ग्रुप फोटोही इंस्टा स्टोरीतून पोस्ट केले. (Photo Credit : Instagram)