
यूपीएएससी ही जगातील काही अवघड परीक्षांपैकी एक. अनेक विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करुन क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बालगून असतात. मात्र सर्वांनाच यूपीएसएसी क्रॅक करता येत नाही. मात्र टीम इंडियात असा एक खेळाडू होऊन गेलाय, जो यूपीएससी परीक्षेत पास झाला आहे.

अमित खुरासिया याने टीम इंडियाचं काही सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. अमित खुसारियाने क्रिकेटमध्ये येण्यासाठी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं होतं.

अमित खुरासिया यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ही अल्पावधीची ठरली. तसेच ते यूपीएससी परीक्षा पास असल्याचं फार कमी जणांनाच माहित आहे.

अमित खुरासिया सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दिग्गजांसह खेळला आहे. तसेच टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासोबतही अमित क्रिकेट खेळला आहे.

अमित खुरासिया याने टीम इंडियाचं एकूण 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अमितने या 12 सामन्यांमध्ये 149 धावा केल्या आहेत.