
सर्वाधिक धावा| विराट कोहली वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या.

सर्वाधिक विकेट्स| मोहम्मद शमी याने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. शमीने 6 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

सर्वाधिक सिक्स| टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकले. रोहितने आतापर्यंत 28 सिक्स लगावले आहेत.

सर्वोत्तम बॉलिंग | सर्वोत्तम बॉलिंगबाबतही मोहम्मद शमीच नंबर 1 आहे. शमीने न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये 57 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या.

बेस्ट बॅटिंग एव्हरेज| बेस्ट बॅटिंग एव्हरेजबाबत विराट कोहली नंबर 1 आहे.विराटने वर्ल्ड कपमध्ये 101.57 च्या सरासरीने धावा केल्या.

सर्वोत्तम इकॉनॉमी रेट| जसप्रीत बुमराह याने बेस्ट इकॉनॉमीने बॉलिंग केली. बुमराहने वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 3.98 या हिशोबाने धावा दिल्या.

सर्वाधिक अर्धशतकं| विराट कोहली यानेच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं केली आहेत. विराटने 10 डावांमध्ये 8 अर्धशतक केली.

सर्वोत्तम बॉलिंग एव्हरेज| मोहम्मद शमीने बेस्ट बॉलिंग एव्हरेजसह विकेट्स घेतल्या आहे. शमीचा बॉलिंग एव्हरेज 9.13 इतका आहे.

सर्वोत्तम बॉलिंग स्ट्राईक रेट | सर्वोत्तम बॉलिंग स्ट्राईक रेटमध्येही मोहम्मद शमी सरस आहे. शमीने वर्ल्ड कपमध्ये 11 बॉलनंतर विकेट घेतली आहे.