
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याची 4 ऑक्टोबरला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुबमन ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजपासून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. शुबमनची या निमित्ताने संपत्ती किती आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमनचा बीसीसीआयच्या वार्षिक करारात अ श्रेणीत समावेश आहे. शुबमनला बीसीसीआयकडून वार्षिक कराराच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

खेळाडूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त बीसीसीआयकडून प्रत्येक सामन्यासाठी मानधन दिलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय खेळाडूंना टी 20i, वनडे आणि टेस्ट मॅचसाठी प्रत्येकी 3, 6 आणि 15 लाख रुपये दिले जातात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमन गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचं नेतृत्व करतो. गुजरातने शुबमनला 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) 16.5 कोटी रुपयांत आपल्यासह कायम ठेवलं. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमन क्रिकेटशिवाय जाहीरातीच्या माध्यमातूनही कमाई करतो. शुबमन जिलेट, एमआरएफ, नाईकी, टाटा कॅपिटल आणि अन्य ब्रँडसाठी जाहीरात करतो. शुबमन ब्रँड एंडॉर्समेंटद्वारे वार्षिक 6 ते 8 कोटी रुपये कमावतो. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमन गिल वार्षिक करार, आयपीएल, जाहीरात आणि अन्य माध्यमातून तगडी कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनचं एकूण नेटवर्थ 30 ते 35 कोटी रुपये इतकं आहे. (Photo Credit : @ShubmanGill X Account)