AUS vs IND : रोहित-विराट सुपर फ्लॉप, कॅप्टन गिल ढेर, टीम इंडियासह 6 वर्षांनंतर पुन्हा तसंच झालं

टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील 3 अनुभवी फलंदाज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल या तिघांनाही आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

| Updated on: Oct 19, 2025 | 6:25 PM
1 / 5
टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरले.  टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी घोर निराशा केली. त्यामुळे चाहतेही निराश झालेले पाहायला मिळाले. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची झालेली पडझड पाहून चाहत्यांना 6 वर्षांआधी झालेला असाच एक प्रकार आठवला.   (Photo Credit: PTI)

2 / 5
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताची 3 आऊट 25 अशी स्थिती झाली. सर्वात आधी रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर बाद झाला. रोहित कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर फक्त बॅट्समन म्हणून खेळताना कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र रोहितने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. (Photo Credit: PTI)

3 / 5
विराटची स्थिती तर रोहितपेक्षा वाईट झाली. विराटला तर भोपळाही फोडता आला नाही. विराटची ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट होण्याची पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: PTI)

4 / 5
तसेच एकदिवसीय कर्णधार म्हणून शुबमन गिलकडे साऱ्यांचंच बारीक लक्ष होतं. मात्र शुबमनलाही काही खास करता आलं नाही. शुबमनने रोहितपेक्षा 2 धावा अधिक केल्या. शुबमन 10 धावा करुन आऊट झाला.  (Photo Credit: PTI)

5 / 5
अशाप्रकारे टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील या त्रिकुटाने मिळून एकूण 18 धावा केल्या.  टीम इंडियाची 2019 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर टॉप 3 फलंदाजांनी कमी धावा करण्याची ही पहिली वेळ ठरली. टीम इंडियाकडून 2019 साली रोहित, विराट आणि केएल या तिघांनी एकूण 3 धावा केल्या होत्या. (Photo Credit:: Nathan Stirk/Getty Images)