Umesh Yadav : अनुभवी गोलंदाजाला निवड समितीकडून संधी, टीम इंडियाचा स्टार कमबॅकसाठी सज्ज

Umesh Yadav Syed Mushtaq Ali Trophy 2025 : उमेश यादव सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाच्या अनुभवी गोलंदाजाकडे या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन आगामी आयपीएल मिनी ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर फ्रँचायजीचं लक्ष वेधण्याची संधी आहे.

Updated on: Nov 23, 2025 | 9:21 PM
1 / 5
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 26 नोव्हेंबरपासून  सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी लवकरच मिनी ऑक्शन होणार आहे. त्याआधी या स्पर्धेत अनेक खेळाडू आपली छाप सोडताना दिसणार आहेत. या स्पर्धेत भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादव खेळताना दिसणार आहे.  (Photo Credit : GETTY)

2 / 5
विदर्भने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. हर्ष दुबे विदर्भाचं नेतृत्व करणार आहे. तसेच उमेश यादव यालाही संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : GETTY)

3 / 5
उमेश यादव अनफिट असल्याने गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. उमेशने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये शेवटचा व्यवसायिक सामना खेळला होता. उमेश तेव्हाही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतच खेळला होता. मात्र आता उमेश या टी 20 स्पर्धेतून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo Credit : GETTY)

4 / 5
उमेश यादव 38 वर्षांचा आहे. उमेश आयपीएलच्या 18 व्या मोसमातही खेळला नव्हता. उमेश गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र आता उमेशकडे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन आयपीएलमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
तसेच उमेश टीम इंडियासाठी 2 वर्षांपासून एकही सामना खेळलेला नाही. उमेश भारतासाठी 2023 साली अखेरचा सामना खेळला होता. उमेशने भारताचं 57 कसोटी, 75 वनडे आणि 9 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. उमेशने या तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 288 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)