Team India : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे 4 युवा फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?

Indian Cricket Team : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू कोण? जाणून घ्या भारतासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणाऱ्या 4 खेळाडूंबाबत.

Sanjay patil | Updated on: Jun 24, 2026 | 8:13 PM
1 / 5
टीम इंडियासाठी आतापर्यंत अनेक खेळाडूंनी टी 20i पदार्पण केलंय. यापैकी भारतासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणाऱ्या 4 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियासाठी आतापर्यंत अनेक खेळाडूंनी टी 20i पदार्पण केलंय. यापैकी भारतासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणाऱ्या 4 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

2 / 5

राहुल चाहर टीम इंडियासाठी टी 20i पदार्पण करणारा चौथा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. राहुलने 6 ऑगस्ट 2019 साली वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणारा भारताचा तिसरा खेळाडू आहे. इशांतने 1 फेब्रुवारी 2008 रोजी वयाच्या 19 वर्ष 152 व्या दिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. (Photo Credit : PTI)

4 / 5

ऋषभ पंत टीम इंडियासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणारा दुसरा खेळाडू आहे. पंतने 1 फेब्रुवारी 2017 साली इंग्लंड विरुद्ध वयाच्या 19 वर्ष 120 व्या दिवशी पदार्पण केलं होतं. (Photo Credit : PTI)

5 / 5

तर टीम इंडियासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पणाचा विक्रम हा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याच्या नावावर आहे. सुंदरने 24 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं होतं. सुंदरचं वय तेव्हा 18 वर्ष 180 दिवस इतकं होतं. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us