Virat Kohli याचं Net Worth किती? वर्षभरात कमावतो इतके कोटी, जाणून घ्या आकडा

Virat Kohli Net Worth: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने रोहित शर्मा याच्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विराटने जसं मैदानात खोऱ्याने धावा केल्या तसंच मैदानाबाहेर रग्गड कमाईही केली. जाणून घ्या विराटचं नेटवर्थ.

| Updated on: May 13, 2025 | 1:07 PM
1 / 6
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सोमवारी 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. विराटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. विराट क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट वर्षभरात कोटींची कमाई करतो. विराटला बीसीसीआकडून वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात.   (Photo Credit : Bcci X Account)

2 / 6
विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 123 सामने खेळले आहेत. विराटने या 123सामन्यांमध्ये जवळपास 47 च्या सरासरीने 9 हजार 230 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच  विराटने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. विराटने त्यापैकी 40 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.  (Photo Credit : Bcci X Account)

3 / 6
विराटला बीसीसीआयकडून वार्षिक करारातील ए प्लस ग्रेडनुसार 7 कोटी रुपये मिळतात. तसेच विराट आयपीएलमधूनही चांगली कमाई करतो. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्रतिनिधित्व करतो. विराटला आयपीएलमधून एका पर्वासाठी 21 कोटी रुपये मिळतात.  (Photo Credit : Bcci X Account)

4 / 6
तसेच विराट मॅच फीमधूनही विराटची चांगली कमाई होते. बीसीसीआयकडून प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 आणि टी 20I मॅचसाठी 3 लाख रुपये दिले जातात. विराटने टी 20I आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यामुळे आता विराट वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे.  (Photo Credit : Bcci X Account)

5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट 30 पेक्षा अधिक ब्रँडसाठी जाहीरात करतो. विराटला एमआरएफ टायर्सकडून सर्वाधिक पैसा मिळतो.मीडिया रिपोर्ट्सनुसार विराटला 100 कोटी रुपये मिळतात. तसेच विराट बूस्ट, पेप्सी, नेसले या आणि यासारख्या अनेक ब्रँडसह करारबद्ध आहे.  (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
तसेच विराट याशिवाय रेस्टोरेंट, बिजनेस आणि गुंतवणुकीतूनही तगडी कमाई करतो. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली एका वर्षात 200 कोटी रुपये कमावतो. तसेच विराटचं एकूण नेटवर्थ हे 1 हजार 50 कोटी रुपये इतकं आहे. (Photo Credit : Bcci X Account)