
भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.