FIFA World Cup स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर, 20 वर्षानंतर असं घडलं
फिफा वर्ल्डकप आणि त्याच्या सभोवती फिरणाऱ्या रंजक कथा आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत. फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान असाच एक आश्चर्यकारक प्रकार घडला. इक्वाडोरने जर्मनीविरुद्ध विजय मिळवला आणि राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वॉडोर संघाने जर्मनीला 2-1 ने मात दिली आणि 20 वर्षानंतर बाद फेरीत जागा पक्की केली आहे. या विजयानंतर इक्वाडोरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशाचे राष्ट्रपती डेनियल नोबोआने आनंद द्विगुणित करत मोठी घोषणाही करून टाकली. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभारी आहोत. तुम्ही टीका, आपमान आणि कठीण परिस्थितीवर मात करून संपूर्ण देशाला आनंद दिला. उद्या सुट्टी आहे. इक्वाडोर जिंदाबाद' (PHOTO CREDIT- GETTY)

साखळी फेरीत इक्वाडोरचा शेवटचा सामना जर्मनीविरुद्ध पार पडला. या सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला जर्मनीने गोल मारला आणि आघाडी घेतली होती. त्यामुळे इक्वाडोर बॅकफूटवर जाईल असं वाटलं होतं. पण त्यांनी जोरदार कमबॅक केलं. निल्सन एंगुलोने गोल मारत बरोबरी साधली. त्यानंतर या सामन्याच्या 77 व्या मिनिटाला गोंजालो प्लाने विजयी गोल मारला. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप 2006 नंतर इक्वाडोर संघाने बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. 20 वर्षांनी बाद फेरीत खेळण्याची संधी इक्वाडोरला मिळाली आहे. इक्वाडोर असलेल्या ई गटातून जर्मनीने आधीच बाद फेरीत जागा मिळवली होती. पण जर्मनीला पराभूत करत इक्वाडोर तिसऱ्या स्थानावर राहिला. बाद फेरीत बेस्ट 8 संघात इक्वाडोरची वर्णी लागली. (PHOTO CREDIT- GETTY)

जर्मनीला या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं असलं तरी ग्रुप ई मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. जर्मनी 2014 नंतर पहिला बाद फेरीचा सामना खेळणार आहे. मागच्या दोन पर्वात साखळी फेरीतून बाद झाले होते. (PHOTO CREDIT- GETTY)