IPL 2026 स्पर्धेत या पाच गोलंदाजांनी टाकला सर्वात महागडा स्पेल, एका सामन्यात दिल्या 60 पेक्षा जास्त धावा
आयपीएल स्पर्धेत 50 सामन्यांचा खेळ संपला असून आता प्लेऑफसाठी चुरशीची लढाई सुरू झाली आहे. असं असताना काही गोलंदाज एका सामन्यात महागडे ठरले आहेत. चला जाणून घेऊयात आतापर्यंतच्या हंगामात सर्वात महागडा स्पेल टाकणारे टॉप 5 गोलंदाज कोण ते...

आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. काही विक्रम हवेसे, तर काही विक्रम नकोसे झाले आहे. आतापर्यंत या स्पर्धेत काही गोलंदाज खूपच महागडे ठरले आहेत. काही स्टार गोलंदाजांनी एकाच सामन्यात प्रचंड धावा देऊन सर्वात वाईट विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: IPL/BCCI)

या पर्वात झालेल्या 50 सामन्यांमध्ये सर्वात महागडा गोलंदाज पंजाब किंग्सचा झेवियर बार्टलेट ठरला आहे. 25 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 69 धावा दिल्या. याच सामन्यात केएल राहुलने नाबाद 152 धावा केल्या होत्या. (Photo: IPL/BCCI)

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग देखील या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, 28 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकांत 68 धावा दिल्या. त्याने फक्त एक बळी घेतला आणि इतक्या साऱ्या धावा दिल्या. (Photo: IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज साकिब हुसेन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आपला पहिला आयपीएल हंगाम खेळत असलेल्या साकिबने 25 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध 4 षटकांत 62 धावा दिल्या. पण पहिल्या सामन्यांमध्ये 4 बळी घेऊन त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. (Photo: IPL/BCCI)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 6 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या 4 षटकांत 61 धावा दिल्या. या सामन्यात पंजाबचा केवळ पराभवच झाला नाही, तर पंजाबच्या गोलंदाजांच्या अपयशानेही संघाला मोठा धक्का बसला. (Photo: IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 18 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या 4 षटकांत 60 धावा दिल्या. पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची विकेट घेऊन चर्चेत आला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने त्याच्याकडून वसुली करून एकाच षटकात चार षटकार मारले होते. (Photo: IPL/BCCI)