IND W vs PAK W: कोणा कोणाला रोखणार? आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची भंबेरी उडणार
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य भारताने आधीच धडक मारली आहे. त्यात साखळी फेरीचा शेवटचा पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आधीच अडचणीत आहे. असं असताना पाकिस्तानसमोर भारतीय खेळाडूंना रोखण्याचं मोठं आव्हान आहे.

वुमन्स आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. पण पाकिस्तानसमोर भारतीय खेळाडूंना रोखण्याचं आव्हान असणार आहे. कारण भारतीय संघ एक दोन खेळाडूंच्या भरवशावर नाही, तर संपूर्ण संघ भारी आहे. (Photo: PTI/Getty)
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर पाकिस्तान गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात. दीप्ति शर्मा अष्टपैलू कामगिरी करून पाकिस्तानची डोकेदुखी वाढवू शकते. ऋचा घोष आणि दीप्ति शर्माचा स्ट्राईक रेट पाहिला तर त्यांचा आक्रमकपणा काय आहे ते समजून येते. (Photo: PTI/Getty)
भारत पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान स्मृती मंधानाला मिळाला आहे. तिने 11 सामन्यात 307 धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर तिच्या खालोखाल असून तिने 16 सामन्यात 230 धावा केल्या आहेत. (Photo: PTI/Getty)
भारत पाकिस्तान टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऋचा घोष सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारी फलंदाज आहे. तिने 5 सामन्यात 178.43 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर शफाली वर्मा असून तिचा स्ट्राईक रेट हा 123.30 आहे. (Photo: PTI/Getty)
भारत पाकिस्तान सामन्यात दीप्ति शर्माने आपला आक्रमक खेळ दाखवला आहे. तिने 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 14 विकेट काढल्या आहे. पाकिस्तानविरुद्ध टाकलेल्या एका स्पेलमध्ये तिने 10 धावा देत 5 विकेट काढल्या आहेत. (Photo: PTI/Getty)