AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6, 6, 6, 6, 6… आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची आधीच चर्चा रंगली आहे. असं असताना या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

6, 6, 6, 6, 6... आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम
6, 6, 6, 6, 6... आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रमImage Credit source: PTI
| Updated on: Sep 05, 2026 | 4:16 PM
Share

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. भारत पाकिस्तान म्हंटलं तर उत्सुकता असते. पण गेल्या काही वर्षात भारतीय संघ पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेला आहे. इतकंच काय तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर या सामन्यात प्रचंड दबाव असणार आहे. हा सामन्याआधीच भारताची स्थिती मजबूत असल्याचं दिसून येत आहे. असं असताना या सामन्यात क्रीडाप्रेंमीच्या नजरा भारताची सलामीवीर स्मृती मंधानावर खिळल्या आहेत. कारण या सामन्यात तिच्या रडारवर दोन मोठे विक्रम असणार आहेत. मागच्या सामन्यात तिचं झंझावाती शतकी खेळी पाहिल्यानंतर तसंच म्हणावं लागेल. कारण स्मृती मंधाना फॉर्मात आहे आणि आरामात दोन विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकते.

स्मृती मंधानाला पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 षटकार आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचण्याची संधी आहे. स्मृती मंधानाचा आक्रमक खेळ पाहता पाकिस्तानसमोर हा विक्रम रचला जाण्याची शक्यता आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या सूजी बेट्सच्या नावावर आहे. तिने 186 सामन्यातील 178 डावात 4758 धावा केल्या आहेत. स्मृती मंधानाने 173 सामन्यातील 167 डावात 4681 धावा केल्या आहेत. म्हणजेच हा विश्वविक्रम रचण्यासाठी तिला फक्त 78 धावांची गरज आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमासह आणखी एक विक्रम रडारवर असणार आहे. हा विक्रम आहे 100 षटकार मारण्याचा… पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम पूर्ण करण्याची संधी आहे. पाकिस्तानविरुद्ध 5 षटकार मारताच षटकारांचं शतक पूर्ण करेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा स्मृती मंधानाच्या खेळीकडून लागून आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधानाने हा विक्रम पूर्ण करावा अशीच क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत