
भारताचा डावखुरा स्टार फलंदाज युवराज सिंह मद्य व्यवसायात उतरला आहे. त्याने अल्ट्रा प्रिमियम टकिला ब्रँड फिनो भारतात लाँच केला आहे. त्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद कैफ यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात फिनो ब्रँडची झलक पाहायला मिळाली. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

भारतात फिनो हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि काही निवडक ड्यूटी फ्री दुकानात हा ब्रँड उपलब्ध आहे. याची किंमत जवळ 14 हजारांच्या घरात आहे. फिनोचा अर्थ "अपयश हा पर्याय नाही" असा आहे. युवराजच्या क्रिकेट कारकिर्दीला अनुसरून हे नाव देण्यात आलं आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू इयान बोथम, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि केविन पीटरसन यांनी मद्य व्यवसायात युवराज सिंगपूर्वीच उडी घेतली आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

इयान बोथम एक वाइन कंपनी चालवतात. त्यानी 2018 मध्ये वाइन व्यवसाय सुरु केला होता. त्यांची वाइन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वितरीत केली जाते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग सध्या पाँटिंग वाइन्स नावाने हा व्यवसाय करत आहे. त्याच्या कंपनीची वाइन्स भारतातही मिळते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्म अँडरसन या व्यवसायत उतरला आहे. त्याने 2015 मध्ये क्रिकेट खेळत असताना या व्यवसायात उडी घेतली होती. इंग्लंडचा यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. मागच्या वर्षीच त्याने निवृत्ती घेतली आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)