मागच्या 24 तासात तीन शतकं होता होता राहिली, 3 धावांनी केला घात!

आयपीएलचं 18वं पर्व सुरु असून आतापर्यंत सहा सामने पार पडले आहेत. यात सहा संघांनी 200 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. यात इशान किशनने एकमेव शतकं मारलं आहे. उर्वरित दोन फलंदाजांचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं आहे.

| Updated on: Mar 27, 2025 | 3:41 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत पुढे काय होणार याची रंगीत तालीम पहिल्या सहा सामन्यात दिसून आली आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहलीने 59, फिल सॉल्टने 56 धावांची खेळी केली. तर सनरायर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात इशान किशनने नाबाद 106 धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर आणि क्विंटन डी कॉक यांचं शतकं अवघ्या काही धावांनी हुकलं.

2 / 5
श्रेयस अय्यर: अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने फक्त 42 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. नाबाद राहूनही अय्यर केवळ 3 धावांनी शानदार शतकाला मुकला.

3 / 5
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टिम सेफर्टने २६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्धच्या पाचव्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. या सामन्यात 38 चेंडूंचा सामना करणाऱ्या सेफर्टने 10 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. त्याचं शतक फक्त तीन धावांनी हुकलं.

4 / 5
क्विंटन डी कॉक: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात 61 चेंडूंचा सामना करणाऱ्या डी कॉकने 6 शानदार षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. त्याचं शतकही तीन धावांनी हुकलं.

5 / 5
गेल्या 24 तासांत तीन फलंदाज फक्त तीन धावांनी शतकाला हुकले आहेत. पण, मैदानात उतरलेल्या या तिन्ही संघांनी मोठे विजय मिळवले. या वर्षीच्या आयपीएलमध्ये शतक करणारा इशान किशन हा एकमेव खेळाडू आहे. या यादीत दुसरा फलंदाज कोण जोडला जाईल हे पाहणे बाकी आहे. (Photo- टीव्ही 9 कन्नड)