तिलक वर्माची टी20 मध्ये ऐतिहासिक कामगिरी, असं करणारा पहिला भारतीय ठरला

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. भारताच्या इतर फलंदाजांना त्याने मागे टाकलं आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 9:19 PM
1 / 5
तिलक वर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिलक वर्मासाठी ही कामगिरी खास ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये तिलक वर्माने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध 4 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासह 25 वर्षाच्या आत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
तिलक वर्माने 23 वर्षे आणि 31 दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे. त्याने 34 डावात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता. पण त्याने 25 वर्षे 65 दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती. तिलक वर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 हजार धावा करणारा 13वा भारतीय आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा वेगाने करणारा पाचवा भारतीय आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने 27 डावात हा आकडा गाठला होता. अभिषेक शर्मा 28 डावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
तिलक वर्मा या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने या डावात 32 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 26 धावा केल्या. या दरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. (PHOTO CREDIT- PTI)