
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी 20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. त्यामुळे नेमका चेंडू कुठे टाकायचा हेच दक्षइण अफ्रिकन गोलंदाजांना कळत नव्हतं. दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. भारताने 1 गडी गमवून 283 धावा केल्या आणि विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं.

संजू सॅमसनने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या. तर तिलक वर्माने 47 चेंडूत 10 षटकार आणि 9 चौकरांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या.

तिलक वर्माने 41 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 244 चा होता. यात त्याने 8 चेंडू निर्धाव घालवले होते.

तिलक वर्माच्या या खेळीसह सलग दोन शतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सलग दोन शतक करण्याचा विक्रम पाच खेळाडूंच्या नावावर आहे. गुस्तव मकेअन, रिली रोस्सो, फिल सॉल्ट आणि संजू सॅमसनने अशी कामगिरी केली होती. आता या यादीत तिलक वर्माचं नाव समाविष्ट झालं आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा हे दोघंही फॉर्मात आहेत. पण या दोन्ही खेळाडूंना त्या त्या फ्रेंचायझींनी रिटेन केलं आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मेगा लिलावात नाही. नाही तर या दोन्ही खेळाडूंसाठी मोठी बोली लागली होती. सर्व फोटो : बीसीसीआय