Team India : टीम इंडिया विरुद्ध टी 20iमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, चौथ्या स्थानी भारताचा जावई

Most T20i Runs Against India : टीम इंडियाच्या इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेला 1 जुलैपासुन सुरुवात होत आहे. या निमित्ताने टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

Sanjay patil | Updated on: Jul 01, 2026 | 5:09 PM
1 / 5
टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर याच्या नावावर आहे. बटलरने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध 28 सामन्यांमधील 25 डावांत 31.85 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. बटलरने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5

दक्षिण आफ्रिकेचा डेव्हीड मिलर टीम इंडिया टी 20i फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मिलरने 29 सामन्यांमधील 26 डावांत 626 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज निकोलस पूरन तिसऱ्या स्थानी आहे. पूरनने टीम इंडिया विरुद्ध 20 सामन्यांमध्ये 592 धावा केल्या आहेत. पूरनने 32.88 च्या सरासरीने या धावा केल्यात. (Photo Credit : PTI)

4 / 5

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर आणि भारताचा जावई ग्लेन मॅक्सवेल चौथ्या स्थानी विराजमान आहे. मॅक्सवेल याने टीम इंडिया विरूद्धच्या 24 टी 20i सामन्यांतील 22 डावात 576 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज क्वींटन डी कॉक हा पाचव्या स्थानी आहे. क्विंटनने 16 सामन्यांतील 15 डावांत एकूण 513 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us