T20 World Cup स्पर्धेत टेस्ट सारखी बॅटिंग, सर्वात कमी स्ट्राईक रेटने धावा करणारे 5 फलंदाज, बाबर आझम पहिल्या स्थानी

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये सर्वाधिक 3 पाकिस्तानचे आहेत. या 5 फलंदाजांमध्ये एका माजी दिग्गज कर्णधाराचाही समावेश आहे. जाणून घ्या.

Sanjay patil | Updated on: Feb 18, 2026 | 5:13 PM
1 / 6
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात (T20i World Cup 2026) एका जागेचा अपवाद वगळता सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत इशान किशन आणि श्रीलंकेच्या पाथुम निसंका या फलंदाजांनी स्फोटक बॅटिंगच्या जोरावर चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तर दुसऱ्या बाजूला या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात काही असे फलंदाज आहेत ज्यांनी सर्वात कमी स्ट्राईक रेटने धावा केल्यात. त्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 6

पाकिस्तानचा फलंदाज आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात कमी स्ट्राईक रेटने धावा करण्याबाबत पाचव्या स्थानी आहे. रिझवानने 112.9 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रिझवानला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत संधी देण्यात आली नाही. (Photo Credit : PTI)

3 / 6

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन या यादीत चौथ्या स्थानी आहे. केनने 112.53 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने या स्पर्धेत 112.22 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात. (Photo Credit : PTI)

5 / 6

पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर मोहम्मद हाफीज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हाफीजने 111.81 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. हाफीज सध्या तज्ज्ञ म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीचे धडे देतोय. (Photo Credit : PTI)

6 / 6

तसेच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम हा पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याच्या नावावर आहे. बाबर सध्या सुरु असेल्या वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us