
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले. आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील 5 सामने जिंकले आहेत.

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.