
आयपीएल 17 व्या मोसमाच्या लिलावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलमध्ये तोडफोड बॅटिंग करणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्या ऑलराउंडर्स खेळाडूंचीही चर्चा पाहायला मिळत आहे. ऑलराउंडर्स म्हटवल्यावर सर्वात आधी विडिंजच्या खेळाडूंचं नाव आवर्जुन घेतलं जात. यामध्ये कायरन पोलार्डचं नाव आघाडीवर आहे. पोलार्डने 189 सामन्यात 3 हजार 412 धावा केल्या आहेत. तसेच 69 विकेट्सही मिळवल्या आहेत.

आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानी आहे. रसेलने 112 सामन्यांमध्ये 2262 धावा आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याने आयपीएलमधील 145 सामन्यांमध्ये 3874 धावा केल्या आहेत. तसेच 92 विकेट्सही घेतल्या आहेत.

बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 71 सामन्यांमध्ये 793 धावा केल्या आहेत. तसेच 63 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बेन स्टोक्स याने 45 सामन्यांमध्ये 935 धावा केल्या आहेत. तसेच स्टोक्सच्या नावावर 28 विकेट्सही आहेत.

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये 2677 धावा केल्या आहेत. तर 152 विकेट्सही घेतल्या आहेत.