IPL 2026: आयपीएल स्पर्धेसाठी ट्रेड विंडो ओपन, या दिवसापासून खेळाडूंची होणार देवाणघेवाण; ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेची आतापासून तयारी सुरु झाली आहे. दहाही फ्रेंचायझी संघ बांधणीसाठी आता ट्रेड विंडोचा वापर करणार आहे. कारण मिनी लिलाव पार पडण्यापूर्वीच संघांना ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण करता येणार आहे. चला जामून घेऊयात याबाबत सविस्तर

| Updated on: Jul 01, 2025 | 3:21 PM
1 / 5
आयपीएल 2026 अर्थात स्पर्धेच्या 19व्या पर्वासाठी आता दहाही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. या स्पर्धेच्या दृष्टीने आता तयारी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येणार आहे. 4 जुलैपासून ट्रेड विंडो ओपन होणार आहे.

2 / 5
दहा फ्रेंचायझी आपल्या खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. तसेच आवश्यक खेळाडू ट्रेड विंडोच्या माध्यमातून जास्तीची किंमत मोजून विकत घेऊ शकतात. या दोन माध्यमातून नवीन खेळाडू फ्रेंचायझीसोबत जोडता येईल.

3 / 5
2023 मध्ये गुजरात टायटन्स संघात असलेल्या हार्दिक पंड्याला 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याला ट्रेड विंडो माध्यमातून थेट खरेदी केले होते. थेट खरेदी करण्याची संधी असल्याने, खेळाडू देऊन संघात दुसरा खेळाडू जोडता येतो.

4 / 5
ट्रेड विंडो पर्याय आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाच्या एक महिना आधीपर्यंत लागू असेल. शुक्रवार 4 जुलैपासून सर्व फ्रँचायझी ट्रेड विंडोची गणना करण्यास सुरुवात करतील.

5 / 5
ट्रेड विंडोमधून कोणता खेळाडू कोणत्या संघाचा भाग असेल? आयपीएल सीझन 19  आधी कोण कोणत्या संघात प्रवेश करेल हे पाहणे बाकी आहे.