
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु झाल्यापासून काही ना काही विक्रमांची नोंद होताना दिसत आहे. काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडले जात आहेत. विक्रम म्हंटलं की वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोन फलंदाज समोर येतात. पण या दोघांकडे लक्ष असताना श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: Getty Images)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 17 जानेवारीला जापान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेची ओपनिंग जोडी मैदानात उतरली आणि इतिहास रचला. दिमंता महावितना आणि वीरन चामुडिता यांनी सलामीला येत एका विक्रमाची नोंद केली. (Photo: Getty Images)

दिमंता महावितना आणि वीरन चामुडिता या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43.5 षटकात 328 धावांची भागीदारी केली. महावितना 115 धावा करून बाद झाला. तेव्हा त्यांची 328 धावांच्या भागीदारीची दखल आयसीसीने घेतली. युथ वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी असल्याचं जाहीर केलं. (Photo: Getty Images)

वीरनच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला असता. पण त्याची संधी फक्त 8 धावांनी हुकली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनण्याची संधी होती. 192 धावांवर बाद झाला. (Photo: Getty Images)

जपानी गोलंदाजांची हाराकिरी झाली. पण मध्यमगती गोलंदाज टिमोथी मूरने काही कौशल्य दाखवले. त्याने 6 षटकांत 43 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. यात वीरनचा विकेटही होता. श्रीलंकेने 50 षटकांत चार विकेट्स गमावून 387 धावा केल्या. (Photo: Getty Images)