उर्विल पटेलला न घेतल्याचा फ्रेंचायझींना पश्चाताप! दुसऱ्यांदा नाकावर टिचून केलं सिद्ध

आयपीएल 2025 मेगा लिलावात काही खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव झाला. तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामुळे त्यांना या पर्वात घरी बसून मॅच पाहण्याशिवाय पर्याय नाही. असं असताना उर्विल पटेलने फ्रेंचायझींवर पश्चाताप करण्याची वेळ आणली आहे. सलग दुसरं स्फोटक शतक ठोकत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

| Updated on: Dec 03, 2024 | 3:03 PM
1 / 7
सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत उर्विल पटेलने आणखी एक स्फोटक शतक ठोकलं आहे. या स्पर्धेत आधीत त्याने 28 चेंडूत शतक ठोकून लक्ष वेधून घेतलं होतं. आता 36 चेंडूत पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. त्यामुळे उर्विल पटेल जबरदस्त फॉर्मात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत उर्विल पटेलने आणखी एक स्फोटक शतक ठोकलं आहे. या स्पर्धेत आधीत त्याने 28 चेंडूत शतक ठोकून लक्ष वेधून घेतलं होतं. आता 36 चेंडूत पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. त्यामुळे उर्विल पटेल जबरदस्त फॉर्मात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

2 / 7

सैयद मुश्ताक अली स्पर्धेतील ब गटात उत्तराखंड आणि गुजरात हे संघ आमनेसामने आले होते. इंदुरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल उत्तराखंडच्या बाजूने लागला. त्यांनी 20 षटकात 7 गडी गमवून 182 धावा केल्या.

3 / 7

उत्तराखंडने विजयासाठी दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या उर्विल पटेलने आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या षटकापासूनच उत्तराखंड संघावर हावी झाला. याच स्पर्धेत दुसरं वेगवान शतक ठोकलं. अवघ्या 36 चेंडूत शतक पूर्ण केलं.

4 / 7

टी20 क्रिकेटमध्ये 40 पेक्षा कमी चेंडूत दोन शतकं ठोकणारा भारताचा एकमेव फलंदाज ठरला आहे. तर जगाच्या पाठीवर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम डेव्हिड मिलरने केला आहे.

5 / 7

2013 मध्ये पंजाब किंग्सकडू खेळणाऱ्या डेव्हिड मिलरने आरसीबीविरुद्ध 38 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज होता.

6 / 7

डेव्हिड मिलरच्या या विक्रमाची उर्विल पटेलने बरोबरी केली आहे. त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत, तर उत्तराखंडविरुद्ध अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याने टी20 क्रिकेटमध्ये एक मैलाचा दगड गाठला आहे.

7 / 7

उत्तराखंडविरुद्ध उर्विल पटेलने एकूण 41 चेंडू खेळत 11 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 111 धावा केल्या. उत्तराखंडने दिलेलं 183 धावांचं आव्हान गुजरातने 13.1 षटकात दोन गडी गमवून पूर्ण केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us