Asian Games 2026: वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माचा विक्रम मोडण्याची शक्यता, किती षटकारांची गरज?
वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवल्यापासून विक्रमांची नोंद करत आहे. प्रत्येक सामन्यात त्याच्या नावावर काही ना काही विक्रम नोंदवला जात आहे. असं असताना आता त्याच्या रडारवर अभिषेक शर्माचा विक्रम आहे.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जापानमध्ये होणार आहे. यात क्रिकेट असून टी20 फॉर्मेटमध्ये खेळलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली गेली आहे. यात वैभव सूर्यवंशीचं नाव आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढू शकतो. (Photo: Instagram)

अभिषेक शर्माचा कोणता विक्रम वैभवच्या रडारवर आहे?हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तर एशियन्स गेम्स 2026 अभिषेकचा षटकारांचा विक्रम मोडू शकतो. अभिषेक एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारले आहे. हा विक्रम त्याने 2025 मध्ये केला होता. आता वैभव या विक्रमाच्या जवळ आहे. (Photo: Instagram)

अभिषेक शर्माने वर्ष 2025 मध्ये 108 षटकार मारले होते. एका कॅलेंडर वर्षात भारतीय खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. आता हा विक्रम वैभवच्या रडारवर आहे. अभिषेकचा हा विक्रम मोडण्यासाठी वैभवला फक्त 23 षटकारांची गरज आहे. (Photo: Instagram)

वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खेळलेल्या 40 टी20 डावात 140 षटकार मारले आहेत. यात 86 षटकार याच वर्षी मारले आहे. आतापर्यंत खेळलेल्या 22 टी20 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. (Photo: Instagram)

अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर एशियन गेम्स आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध 23 षटकारांचं गणित सुटलं नाहीतर एशियन्स गेम्समध्ये ते शक्य होऊ शकतं. त्यामुळे आता वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. (Photo: Instagram)