
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 233 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 393 धावा केल्या. तर दक्षिण अफ्रिकेला 160 धावांवर गुंडाळलं. यासह तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. (Photo- BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशीने चार देशात शतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कतारनंतर 14 वर्षीय वैभवचे दक्षिण अफ्रिकेत चौथे शतक ठोकले. इतकंच काय तर तिसऱ्या सामन्यात कर्णधार म्हणून त्याने पहिले शतक ठोकले. (Photo- BCCI Twitter)

युवा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा कसोटीतही शतक झळकावले आहे. वैभवने इंडिया अ संघाकडून आशिया कपमध्येही शतक झळकावले होते. इतकंच काय तर विजय हजारे ट्रॉफीमध्येही बिहारकडून शतक झळकावले आहे. (फोटो- PTI)

वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या वनडे सामन्यात 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर63 चेंडूत शतक झळकावले. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये युवा एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा वैभव सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. (Photo: BCCI)

वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघाला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केले. यासह वैभवने 13 वर्षे जुना विक्रम मोडून इतिहास रचला आहे. द्विपक्षीय अंडर 19 वनडे मालिकेत क्लीन स्वीप देणार सर्वात तरुण भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने उन्मुक्त चंदचा विक्रम मोडला आहे. तेव्हा तो 17 वर्षांचा होता. (Photo- BCCI Twitter)