
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 77 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने 50 षटकात 254 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 247 धावांपर्यंत मजल मारू शकला. (Photo- PTI)

विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 77 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराटने 15 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या. (Photo: BCCI)

गुजरातविरुद्ध केलेल्या 77 धावानंतर त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कामगिरीसाठी विराट कोहलीला 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. डीडीसीएने विराटचा हा सोशल मीडियावर टाकला आहे. (Photo- DDCA Twitter)

विराट कोहलीला देण्यात आलेल्या 10 हजार रुपयांच्या चेकमुळे संताप व्यक्त झाला आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड इतके छोटे बक्षीस कसे देऊ शकते असा प्रश्न उपस्थित झाला. (Photo- PTI)

विजय हजारे ट्रॉफी लीग सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना 10 हजार रुपये दिले जातात. त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी समान नियमच आहे. दोन सामन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त सरासरीने त्याने 208 धावा केल्यात. पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध 131 धावा केल्या होत्या. (टीव्ही 9 कन्नडवरून)