
विदर्भ क्रिकेट टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली. विदर्भाने कर्नाटकावर 6 विकेट्सने मात केली. विदर्भाने यासह सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची कामगिरी केली. तर गतविजेता कर्नाटक अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. (Photo: PTI)

कर्नाटकाच्या पराभवामुळे त्यांचं अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न भंग झालं. मात्र हा पराभव अनुभवी फलंदाज करुण नायर याच्यासाठी फार दुर्देवी ठरला. करुणने या सामन्यात 76 धावा करुन कर्नाटकाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं होतं. (Photo: PTI)

कर्नाटकाच्या पराभवामुळे करुण नायर कमनशिबी असल्याचं म्हटलं जात आहे. करुणची टीम चॅम्पियन होण्याच्या जवळ पोहचणार होती आणि त्याच्या संघाचा पराभव झाला, करुणसोबत टीम बदलल्यानंतर असं होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. (Photo: PTI)

करुणला सलग दुसऱ्या वर्षी साथ सोडलेल्या संघाकडून पराभूत व्हावं लागलं. करुणने गेल्या मोसमात कर्नाटकाची साथ सोडून विदर्भाकडून खेळताना खोऱ्याने धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर करुण नायरच्या विदर्भाचा अंतिम सामन्यात कर्नाटकाकडून पराभव झाला होता. (Photo: PTI)

त्यानंतर आता करुण विदर्भाची साथ सोड कर्नाटक संघात आला. करुणने या मोसमात कर्नाटकसाठी 412 धावा केल्या. मात्र करुणला या वेळेस माजी संघाकडून अर्थात विदर्भाकडून उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागलं. (Photo: PTI)