
विराट कोहलीने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे सामन्यात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अर्धशतकी खेळी केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच वनडे शतक ठोकलं. या शतकासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI Twitter)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याने 120 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. या शतकासह विराट कोहलीने वनडेत सर्वाधिक शतकांना विक्रम रचला आहे. (Photo- BCCI Twitter)

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 52वं शतक ठोकलं. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा वनडेतील 51 शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता वनडेत सर्वाधिक शतकांचा मान विराट कोहलीला मिळाला आहे. (Photo- BCCI Twitter)

विराट कोहली येत्या काही वनडे सामन्यात शतकात आणखी काही भर घालणार यात काही शंका नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर विराटचं संघातील स्थान आणखी पक्कं झालं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार हे निश्चित झालं आहे. (Photo- BCCI Twitter)

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 7000 वं शतक आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंच्या शतकांचा आकडा मोजला तर एकूण 7 हजार शतकं झाली आहेत. त्यामुळे विराट कोहलीचं हे शतक खास आहे. (Photo- BCCI Twitter)