

पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात विराटने शतक ठोकलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराटने ९८ चेंडूत ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जर विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात हाच फॉर्म कायम ठेवला तर दुबईच्या भूमीवर इतिहास रचेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम सध्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १७ सामन्यांमध्ये ५२ च्या सरासरीने ७९१ धावा केल्या आहेत. या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीने १६ डावांमध्ये ७४६ धावा केल्या आहेत.

विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४६ धावा केल्या तर तो ख्रिस गेलला मागे टाकेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.

आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये विराट कोहलीने ७२.३३ च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. ४ सामन्यांमध्ये कोहलीने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं.