
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. आता 3 डिसेंबरला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो- पीटीआय)

विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना फक्त वनडेत खेळतो. अशा स्थितीत त्याला देशांतर्गत वनडे स्पर्धेत खेळणं भाग आहे. 24 डिसेंबरपासून देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी सुरु होणार आहे. पण या स्पर्धेत खेळण्यास विराट कोहलीने नकार दिला आहे. (फोटो- पीटीआय)

एका वृत्तानुसार, कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याच्या मनःस्थितीत नाही. बीसीसीआयला भारताच्या रोहित आणि विराटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे आणि विजय हजारे ट्रॉफीच्या 2025-26 आवृत्तीत खेळावे अशी इच्छा आहे. पण कोहलीने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- पीटीआय)

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला कोहलीला विशेष सूट देणे अधिक कठीण झाले आहे. एका सूत्राने एनडीटीव्हीला सांगितले की, "मुद्दा विजय हजारे ट्रॉफीचा आहे. कोहली खेळू इच्छित नाही. जेव्हा रोहित देखील खेळत असेल, तेव्हा एका खेळाडूला सूट कशी असू शकते? इतर खेळाडूंना काय सांगावे? खेळाडू तुमच्या सर्वांपेक्षा वेगळा आहे?" (फोटो- पीटीआय)

विराट कोहलीने शेवटचा विजय हजारे ट्रॉफी सामना 16 वर्षांपूर्वी 2010 मध्ये खेळला होता. 2008 ते 2010 पर्यंत त्याने दिल्लीसाठी 13 विजय हजारे ट्रॉफी सामने खेळले आणि एकूण 819 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. (फोटो- पीटीआय)