
विराट कोहली (Virat Kohli) म्हणजेच आरसीबी (RCB) हे जणू समीकरणचं आहे. पण यंदाच्या हंगामानंतर विराट आरसीबीचा कर्णधार राहणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यात केकेआरने मात दिल्याने यंदाच्या स्पर्धेतून आरसीबी बाहेर गेली असून विराटचं आरसीबीचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. पण तरीदेखील आरसीबी संघाच्या सुरुवातीपासूनच्या काळाच विराटचं महत्त्वपूर्ण खेळी करत आहे. सर्वाधिक भागिदारी करणाऱ्यांमध्ये विराट हे नाव सामाईक आहे.

यामध्ये सर्वात पहिलं नाव येत विराट आणि एबी डिव्हिलीयर्सचं. दोघांनी 2016 साली तब्बल 939 धावां एकत्र भागिदारी करुन केल्या होत्या.

यानंतर नंबर लागतो यंदा पार पडलेल्या पर्वातील विराट आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) जोडीचा. यांनीही यंदा (IPL 2021) मिळून तब्बल 601 धावा केल्या आहेत.

आरसीबीकडून विराट आणि ख्रिस गेल (Chirs gayel) जोडीनेही कमाल भागिदारी केली आहे. 2012 साली त्यांनी मिळून 593 धावांचा डोंगर उभा केला होता.

या भागिदारीच्या रेकॉर्डमध्ये विराट आणि केएल राहुल जोडीचे नावही येते. या दोघांनी आयपीएल 2016 मध्ये 574 धावा मिळून भागिदारीमध्ये केल्या होत्या.