टी20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मानंतर दुसरं नाव ठरलं! तर विकेटकीपर बॅट्समनसाठी खलबतं सुरु

आयपीएल स्पर्धेचं 17वं पर्व सुरु आहेत. या स्पर्धेतून काही खेळाडूंची निवड टी20 वर्ल्डकपसाठी केली जाणार आहे. टी20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मेला केली जाऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. या संघात काही खेळाडूंची नाव हळूहळू निश्चित होत आहेत. त्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

| Updated on: Apr 09, 2024 | 8:24 PM
1 / 6
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहेत. आता बीसीसीआयने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीला वर्ल्डकप संघासाठी निवडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

2 / 6
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला टी20 वर्ल्डकप संघातून डावललं जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र विराट कोहलीने आपल्या फलंदाजीतून सर्वांची तोंडं गप्प केली आहेत. त्यामुळे विराट कोहलीची संघात निवड होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

3 / 6
विराट कोहलीने आतापर्यंत केवळ 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. उर्वरित सामन्यांमध्येही कोहलीच्या संघाकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

4 / 6
चांगली फलंदाजी दाखवणाऱ्या कोहलीला कोणत्याही कारणास्तव संघाबाहेर ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याची टी20 विश्वचषकासाठी निवड होण्याची खात्री असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

5 / 6
ऋषभ पंतने 154.55 च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. या माध्यमातून चमकदार कामगिरी करणाऱ्या पंतला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.

6 / 6
1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात विराट कोहली दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विराट कोहलीचा शेवटचा टी20 विश्वचषक असेल. संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मेला होणार आहे.