
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी विराट कोहलीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पण स्पर्धेला एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना विराट कोहलीबाबत धक्कादायक बातमी समरो आली आहे.

सिडनीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीत कोहलीला दुखापत झाली होती. त्याच्या मानेला दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या फिजिओने त्याच्यावर उपचार केले. आता दुखापतीमुळे कोहलीला सौराष्ट्रविरुद्धच्या दिल्ली रणजी ट्रॉफी सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिडनीमध्ये कोहलीच्या मानेच्या दुखापतीवर भारतीय संघाच्या फिजिओने उपचार केले. कोहलीला मानेला इंजेक्शन देण्याची गरज असल्याने उर्वरित दोन रणजी सामन्यांतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही असे दिसते. निवडकर्त्यांना अपडेट दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अधिकाऱ्याने स्पोर्ट्स टॉकला सांगितले की, मानेच्या दुखापतीबाबत कोहलीच्या बाजूने कोणतीही माहिती नाही. ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यावरून परतल्यानंतर कोहली मुंबईत आपल्या कुटुंबासोबत आहे.

विराट कोहलीला रणजी करंडक सामना खेळून एक दशक उलटले आहे. त्याने शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब फॉर्ममुळे कोहलीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.