विराट कोहली फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियाकडून खेळणार, जाणून घ्या कसं ते

विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता विराट कोहली फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 साठी तयारी करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या दोन वर्षात फक्त वनडे क्रिकेट सराव करताना दिसणार आहे.

| Updated on: May 14, 2025 | 7:52 PM
1 / 5
विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत खेळेल असा अंदाज आहे. म्हणजेच दोन वर्षे वनडे क्रिकेट खेळणार आहे. (Photo- PTI)

2 / 5
2027 वनडे वर्ल्डकप संपल्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ 27 वनडे सामने खेळणार आहे. म्हणजेच फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियासाठी खेळेल.  (Photo- PTI)

3 / 5
या वर्षी टीम इंडिया बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर 2026 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.  (Photo- PTI)

4 / 5
27 सामन्यांपैकी 18 सामने हे भारतात होणार आहेत. याचा अर्थ पुढील दोन वर्षात विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 सामने खेळेल. दरम्यान, भारताच्या वनडे वर्ल्डकप संघाची रुपरेषा 2026 नंतर ठरेल.  (Photo- PTI)

5 / 5
विराट कोहलीला या 27 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर त्याला वनडे वर्ल्डकप 2027 संघात स्थान मिळेल. त्यामुळे विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.  (Photo- PTI)