मोहम्मद शमीला टीम इंडियात न घेण्याचं कारण काय? दिग्गज खेळाडूने थेट अजित आगरकरकडे मागितले उत्तर

मोहम्मद शमी हा भारताचा दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही डावललं जात असल्याने आता क्रीडाप्रेमी प्रश्न विचारू लागले आहे. आता या दिग्गज क्रिकेटपटूने उडी मारली आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 6:39 PM
1 / 5
मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. इतकंच काय तर त्याच्या मेहनतीला फळ मिळत आहे. बंगालकडून खेळताना शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे. (फोटो- PTI)

2 / 5
मोहम्मद शमीचा फॉर्म पाहता आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मुख्य निवडकर्ते अजित आगरकर याच्यावर निशाणा साधला आहे. गांगुलीने आगरकरडे थेट त्याच्याकडे उत्तर मागितलं आहे. मोहम्मद शमीला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? असा प्रश्न विचारला आहे.  (फोटो- PTI)

3 / 5
सौरव गांगुलीने शमीबाबत बोलताना सांगितलं की, 'मला आशा आहे की निवडकर्ते शमीची कामगिरी पाहत असतील. शमी आणि निवडकर्त्यांमध्ये चर्चा झाली असेल. पण तुम्ही मला विचाराल तर तो फिटनेस आणि स्किल्समध्ये चांगलं करत आहे.'  (फोटो- PTI)

4 / 5
सौरव गांगुली पुढे म्हणाला, "शमी कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी20 क्रिकेट का खेळू शकत नाही? याचे खरे कारण मला समजत नाही. शमीचे कौशल्य अद्भुत आहे." शमी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे. त्याने गेल्या तीन सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत.  (फोटो- PTI)

5 / 5
मोहम्मद शमीने स्पष्टपणे सांगितले की निवडकर्ते त्याला का निवडत नाहीत हे त्याला माहित नाही. इतकंच काय तर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा शमी म्हणाला होता की, त्याच्या हातात फक्त चांगली कामगिरी करणे आहे, कोणालाही निवडणे आपल्या हातात नाही.  (फोटो- PTI)