FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार टप्प्यावर येत आहे. राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. राउंड 32 मध्ये आतापर्यंत जर्मनी, अमेरिका, मेक्सिको आणि अर्जेंटिना स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, मॅच ऑफ द पुरस्काराची चर्चा रंगली आहे. मुस्लिम खेळाडूंना वेगळी ट्रॉफी दिली जात आहे. कारण काय ते जाणून घेऊयात..

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोकडे आहे. असं असताना या स्पर्धेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या फिफा संस्थेने कोणाचाही भावना दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मुस्लिम खेळाडूंच्या धार्मिक भावनेचा सन्मान करून प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफीत बदल केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या मुस्लिम खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देताना वेगळी ट्रॉफी दिली जाते. या ट्रॉफीवरून दारू कंपनीचं ब्रँडिंग काढलं गेलं आहे. मोरक्कोचा स्टार फुटबॉलपटू इस्माइस साबरीला स्कॉटलँडविरुद्ध चांगली कामगिरी केली म्हणून मॅन ऑफ मॅच पुरस्कार दिला गेला. तेव्हा हे वेगळ्या ट्रॉफीचं प्रकरण समोर आलं. (PHOTO CREDIT- GETTY)

इस्माइल साबरीला ट्रॉफी सोपवली गेली तेव्हा त्याच्या बॅकड्रॉप आणि ट्रॉफीच्या विजुअल्समधून बियर कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग हटवलं होतं. त्याच्या जागी न्यूट्रल डिझाईनचा वापर केला गेला. त्यावर सुपीरियर प्लेयर ऑफ द मॅच आणि फिफा वर्ल्डकपचं ब्रँडिंग लिहिलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच चांगली कामगिरी केलेल्या मुस्लिम खेळाडूंना पुरस्कार देताना या न्यूट्रल ट्रॉफीचा वापर केला आहे. या यादीत इजिप्तचा इमाम अशूर, मोहम्मद सलाह, जॉर्डनचा अली ओलवान, इराणचा रामिन रझाईयान, कतारचा गोलकीपर महमूद अबुनादा आणि आयव्हरी कोस्टचा यान डियोमंडे याचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY)

दरम्यान, इतर खेळाडूंना दारू कंपनीचं ब्रँडिंग असलेली ट्रॉफी दिली जात आहे. तसेच बॅकड्रॉपलाही बियर कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग असते. दोन्ही ट्रॉफी सारख्यात आहेत. पण त्यात हा बदल करण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)