FIFA World Cup 2026: इंग्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी व्हायग्राचा वापर करणार? जाणून घ्या कारण

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडने एन्ट्री मारली आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना यजमान मेक्सिकोशी होणार आहे. मेक्सिकोचं होमग्राउंड असल्याने इंग्लंड संघाने या सामन्यासाठी खास तयारीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 3:12 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना यजमान मेक्सिकोशी होणार आहे. हा सामना मेक्सिकोच्या ऐतिहासिक एज्टेका स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. हे मैदान समुद्र सपाटीपासून जवळपास 2240 मीटर उंचीवर आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
इंग्लंड संघाला मेक्सिको सिटीतील उंचीवर असलेल्या मैदानामुळे त्रासाला सामोर जावं लागू शकतं. ऑक्सिजनची मात्रा कमी असल्याने खेळाडूंना थकावा आणि चक्कर येण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या संकटाचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी उंच भागात होणाऱ्या त्रासाचा सामना करण्यासाठी व्हायग्राचा वापर करण्याची परवानगी देते. इंग्लंडचे मॅनेजर थॉमस ट्यूशेल यांनी आधीच स्पष्ट केलं की, खेळाडूंना तिथल्या वातवरणाशी जुळवून घेण्यास जास्त वेळ मिळणार नाही. त्यानंतर असं बोललं जात आहे की खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
इंग्लंड संघाने या सामन्यासाठी एक खास प्लानही आखला आहे. मैदानाबाहेरील अडचणीचा सामना करण्यास सज्ज आहे. मेक्सिकोच्या चाहत्यांनी इक्वाडोरच्या खेळाडूंना रात्रभर झोपू दिलं नव्हतं. त्यामुळे इंग्लंडने हॉटेलचा पत्ता गुप्त ठेवला आहे. जेणेकरून मेक्सिकोच्या चाहत्यांना त्यांना त्रास देता येणार नाही. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
खेळाडूंना पुरेपूर झोप मिळावी यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. खेळाडूंच्या रुममध्ये व्हाइट नॉइज ऑडियो मशिनचा वापर केला जाणार आहे. तसेच ज्या खेळाडूंकडे ईयर प्लग किंवा स्लीप बँड सारखी उपकरणं नाहीत, त्यांना झोपेची औषधं दिली जातील. (PHOTO CREDIT- GETTY)

Follow Us