WPL 2026 Auction: रिटेन्शननंतर सर्वाधिक रक्कम कुणाकडे? मुंबई कितव्या स्थानी?

WPL 2026 Auction and Retained List : डब्ल्यूपीएल स्पर्धेतील चौथ्या हंगामातील मेगा ऑक्शनआधी एकूण 5 संघांनी आपल्यासह कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी आहे? जाणून घ्या.

| Updated on: Nov 07, 2025 | 9:29 PM
1 / 6
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 नंतर आता अवघ्या काही महिन्यांनी वूमन्स प्रीमियर लीग अर्थात डब्ल्यूपीएल 2026 चा थरार रंगणार आहे. त्याआधी 27 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शनआधी एकूण 5 संघांनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक 5-5 खेळाडू आपल्यासह कायम ठेवले आहेत. तर यूपी वॉरियर्सने 1 खेळाडू रिटेन केला आहे.  (Photo Credit: PTI)

2 / 6
मेगा ऑक्शनमध्ये खर्च करण्यासाठी प्रत्येक फ्रँचायजीला 15 कोटी रुपये देण्यात आले आहेत.  मात्र या रक्कमेतून रिटेन केलेल्या खेळाडूसाठीची रक्कम 15 कोटींमधून वजा केली जाणार आहे. अशात आता खेळाडूंना रिटेन केल्यानंतर कोणत्या संघाच्या खात्यात किती रक्कम आहे? हे आपण जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

3 / 6
यूपी वॉरियर्सच्या खात्यात  सर्वाधिक 14 कोटी 50 लाख रक्कम आहे. यूपीने एकमेव खेळाडू रिटेन केला आहे. यूपीने अनकॅप्ड श्वेता सहरावत हीला 50 लाख रुपयांत रिटेन केलंय. युपीनंतर गुजरातकडे सर्वाधिक रक्कम आहे. गुजरातकडे 9 कोटी आहेत. गुजरातने एश्ले गार्डनरला साडे 3 तर बेथ मुनीसाठी अडीच कोटी रुपये मोजून त्यांना आपल्यासह कायम ठेवलं आहे. (Photo Credit: PTI)

4 / 6
स्मृती मंधानाच्या नेतृत्वात 2024 साली डब्ल्यूपीएल जिकंणाऱ्या आरसीबीने चौघींना रिटेन केलं आहे. आरसीबीने कॅप्टन स्मृती मंधाना-साडे 3 कोटी, विकेटकीपर बॅट्समन ऋचा घोष-पावणे 3 कोटी, एलिस पेरी-2 कोटी आणि श्रेयंका पाटील हीच्या साठी 60 लाख रुपये खर्चले आहेत. आरसीबीने या चौघींना आपल्यासह कायम ठेवलंय. आरसीबीकडे आता मेगा ऑक्शनसाठी फक्त 6 कोटी 15 कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे.  (Photo Credit: PTI)

5 / 6
मुंबई या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. पलटणने आगामी मोसमासाठी 5 खेळाडूंना आपल्यासह कायम ठेवलंय. मुंबईने नॅट सायव्हर ब्रँट, कॅप्टन हरमनप्रीत कौर, हॅली मॅथ्यूज,  अमनजोत कौर आणि जी कामिलीनी या 5 खेळाडूंना आपल्यासह कायम ठेवलंय. या 5 जणांसाठी मुंबईने अनुक्रमे पावणे 4 कोटी, साडे 3 कोटी, अडीच कोटी, पावणे 2 कोटी आणि , 1 कोटी आणि 50 लाख रुपये मोजले आहेत. मुंबईच्या खात्यात फक्त 5 कोटी 75 लाख इतकी रक्कम शेष आहे. (Photo Credit: PTI)

6 / 6
दिल्ली कॅपिट्ल्सकडे सर्वात कमी अर्थात 5 कोटी 70 लाख रुपये इतकी रक्कम आहे. दिल्लीने 5 खेळाडू रिटेन केले आहेत. या 5 पैकी 4 खेळाडूंमध्ये जेमीमा रॉड्रिग्ज,  शफाली वर्मा, एनाबेल सदरलँड आणि मारिजान काप या चौघींचा समावेश आहे. दिल्लीने या चौघींना प्रत्येकी 2.2 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. तर दिल्लीने निकी प्रसादला 50 लाख रुपयात आपल्यासह कायम ठेवलं आहे.  (Photo Credit: PTI)