MI W vs DC W: नाणेफेक होताच दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने रचला इतिहास, झालं असं की..

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने आले. जेमिमा रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व आहे. नाणेफेकीचा कौल झाला आणि जेमिमाच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 10, 2026 | 10:11 PM
1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ नवीन कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये जेमिमाने नाणेफेक होताच विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्याच सामन्यात जेमिमाने कर्णधार म्हणून इतिहास रचला आहे. (Photo: BCCI/WPL)

2 / 5
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये कर्णधारपद भूषवणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिचं वय 25 वर्षे आणि 127 दिवस आहे. यापूर्वी हा विक्रम स्मृती मंधानाच्या नावावर होता. मंधाना पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  महिला संघाचे नेतृत्व करत आहे. तिचा विक्रम आता जेमिमाने मोडला. वुमन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये स्मृती मंधानाचं वय 26 वर्षे 230 दिवस होते. (Photo: BCCI/WPL)

3 / 5
जेमिमा रॉड्रिग्सने पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीनंतर जेमिमा म्हणाली की, 'डीवाय पाटील माझ्यासाठी नेहमीच खास आहेत. मी येथे माझा कसोटी पदार्पण केले. येथे माझा पहिला विश्वचषक जिंकला आणि आता मी या मैदानावर पहिल्यांदाच दिल्लीचे नेतृत्व करत आहे. मला नेतृत्व करायला खूप आवडते. मी 16 वर्षांची असल्यापासून माझ्या राज्य संघाचे नेतृत्व करत आहे, म्हणून ते अनुभव मदत करतात. जबाबदारी माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी बाहेर काढते.' (Photo: BCCI/WPL)

4 / 5
जेमिमा रॉड्रिग्स कर्णधारपद भूषवताना फलंदाजीत काही खास करू शकली नाही. पहिल्याच सामन्यात फक्त 3 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाली. शबनिम इस्माईलच्या गोलंदाजीवर जी कमालिनीने तिचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे संघ अडचणीत आला. (Photo: BCCI/WPL)

5 / 5
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, लिझेल ली (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा (Photo: BCCI/WPL)