AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जर तुमच्याही घरात आहे देवघर तर या नियमांचं आवश्य पालन करा, घरात येईल सुख, समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात देवघर असेल तर कही विशिष्ट नियमांचं पालन हे केलंच पाहिजे, त्यामुळे देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते. मात्र या नियमांचं पालन न केल्यास त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो. चला तर मग या नियमांबद्दल जाणून घेऊयात.

Vastu Shastra : जर तुमच्याही घरात आहे देवघर तर या नियमांचं आवश्य पालन करा, घरात येईल सुख, समृद्धी
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 7:21 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घराची रचना कशी असावी, याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रात तुमचं देवघर कसं असावं याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील अशी काही ठिकाणं असतात, त्या ठिकाणावरून सदैव तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, अशी ठिकाणी ही घरात निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची केंद्रबिंदु असतात. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं देवघर. परंतु जेव्हा तुम्ही आपल्या घरात देवघर बनवून घेतात, तेव्हा काही विशिष्ट नियमांचं पालन करणं गरेजचं असतं, या नियमांच्या पालनामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहते आणि घरात सुख, समृद्धी येते. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होते. चला तर मग हे नियम कोणते आहेत, आणि वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

दिशा – वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेलाच ठेवली गेली पाहिजे, तरच तिचा अपेक्षित परिणाम होतो असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे देवघर बनवताना सर्वात आधी दिशा कोणती आहे ती लक्षात घ्या. तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं, कारण ईशान्य ही देवाची आवडती दिशा आहे. देवघराची रचना अशी असावी की तुम्ही जेव्हा पुजेसाठी बसणार आहात, तेव्हा तुमचं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असलं पाहिजे.

प्रतिमा – देवघरामध्ये तुम्ही लाकडू, विविध धातू आणि संगमरवर यांच्यापासून बनवलेल्या देवांच्या मूर्ती ठेवू शकतात. देवघरात एका देवाची एकच प्रतिमा असावी, त्यापेक्षा अधिक असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. तसेच देवघरामध्ये कधीही तुमच्या पूर्वजांचे फोटो असता कामा नये.

देवघर कधीही जमिनीवर असू नये – वास्तुशास्त्रानुसार देवाचं स्थान हे सर्वोच्च असतं, त्यामुळे देवघर कधीही जमिनीवर ठेवू नका. देवघर हे नेहमी उचांवरच ठेवावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर देवघर हे जमिनीवर असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

स्वच्छता – हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, तुमचं देवघर जिथे आहे, तो भाग नेहमी स्वच्छ असावा. तिथे घरातील कचरा साचू देऊ नये. तसेच देवघराची नियमीत स्वच्छता करावी. देवघराच्या स्वच्छतेनंतर देवाची पूजा करावी. सायंकाळच्यावेळी देवाजवळ दिला लावावा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप