AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेची बीसीसीआयने तारीख बदलली! आता या दिवसापासून रंगणार स्पर्धा

आयपीएल 2026 स्पर्धा अर्थात 19वं पर्व मार्च महिन्यात सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने तारीखही जाहीर केली होती. 26 मार्चपासून स्पर्धा रंगणार असं ठरलं होतं. पण आता यात बदल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? ते जाणून घ्या.

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेची बीसीसीआयने तारीख बदलली! आता या दिवसापासून रंगणार स्पर्धा
IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेची बीसीसीआयने तारीख बदलली! आता या दिवसापासून रंगणार स्पर्धाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Feb 27, 2026 | 7:54 PM
Share

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल मार्च महिन्यात वाजणार हे आधीच ठरलं होतं. इतकंच काय तर स्पर्धेची तारीखही जवळपास निश्चित करण्यात आली होती. 26 मार्चपासून स्पर्धा होणार हे ठरलं होतं. 8 मार्च रोजी टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपली की दोन आठवड्यांनी स्पर्धाला सुरूवात होणार होती. यासाठी बीसीसीआयने तयारीही केली आहे. असं असताना बीसीसीआयने या स्पर्धेच्या तारखेत बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता ही स्पर्धा दोन दिवस उशिराने सुरू होईल असं सांगितलं जात आहे. म्हणजेच यापूर्वी ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होणार होती. आता त्याला 28 किंवा 29 मार्चचा मुहूर्त असणार आहे. असा निर्णय घेण्याचं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2026 चा पहिला सामना कधी होणार? हे सांगितलेलं नाही.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलचा पहिला सामना 28 मार्चला होऊ शकतो. पण 29 मार्चबाबतही विचार केला जात आहे. कारण 28 मार्चला शनिवार आहे. तर 29 मार्चला रविवार येत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या सुट्टीचा विचार करून असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण पहिल्याच सामन्याला प्रेक्षकांनी साथ मिळावी असा बीसीसीआयचा मानस आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलच्या संपूर्ण पर्वाचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, अशी शक्यता आहे. बीसीसीआयने तारखेबाबत तसं काही जाहीर केलं नव्हतं. पण मिनी लिलावादरम्यान फ्रेंचायझींना 26 मार्च ही संभावित तारीख सांगितली होती. तर अंतिम सामना 31 मे रोजी होईल असं सांगितलं होतं.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या नियोजनात अडथळे येऊ शकतात. अशा स्थितीत आयपीएलचे सामने आणि निवडणुकीच्या तारखा एकत्र येऊ नये यासाठी काळजी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं सांगितलं जात होतं. पण निवडणूक आयोगाकडून तशा काही हालचाली दिसत नाहीत. यामुळे बीसीसीआय पुढच्या आठवड्यात वेळापत्रकाची घोषणा करू शकते. त्यानंतर काही बदल करू शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...