AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोणतं आव्हान? अर्शदीप सिंग म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. असं असताना अर्शदीप सिंगने एक अडचण सांगितली आहे.

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोणतं आव्हान? अर्शदीप सिंग म्हणाला...
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोणतं आव्हान? अर्शदीप सिंग म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2026 | 7:12 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदापासून टीम इंडिया तीन विजय दूर आहे. आता तीन विजय मिळवल्यानंतर सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. सुपर 8 फेरीतील भारताचा शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. असं आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेत बऱ्याच चुका केल्या आहेत. खासकरून भारतीय फलंदाजीची कमकुवत बाजू दिसून आली. त्याचा फटका दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बसला. पण भारतीय संघ वेळीच सावध झाला. तसेच झिम्बाब्वे विरुद्धचा सामना 72 धावांनी जिंकला. या सामन्यात फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण गोलंदाजांकडून हवी तशी कृती दिसून आली नाही. त्यामुळे या चुका महागात पडू शकतात. असं असताना भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 24 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. यानंतर अर्शदीप सिंग पत्रकारांशी बोलला की, ‘मी आमच्या गोलंदाजाच्या गटात सर्वात छोटा आहे. संघ माझ्यावर विश्वास टाकत आहे. जर तुम्हाला पावर प्लेमध्ये दोन षटकं टाकण्याची संधी मिळते तर विकेट घेण्याची शक्यता वाढते. कारण त्यावेळेस फलंदाज धावा झटपट करण्याच्या नादात चुकीचे फटके मारून बाद होतात.’

‘मी गोलंदाज प्रशिक्षक मोर्नेसोबत काम करत आहे. कसं सक्रीय राहू शकतो. मी कसं फलंदाजांवर हावी होऊ शकतो. कठीण परिस्थिती स्वत:ला सावरू शकतो आणि आपल्या खेळात सुधारणा करू शकतो. माझी साथ देण्यासाठी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासारखे चांगले गोलंदाज आहेत.’, असंही अर्शदीप सिंग म्हणाला..

वेस्ट इंडिजबाबत म्हणाला की…

‘वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मला वाटते की ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. पण आम्ही आमची रणनिती विकेट आणि परिस्थितीनुसार बनवू.’, असं अर्शदीप सिंग म्हणाला.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला